गॅस सिलेंडरची दरवाढ मागे ?

March 27, 2012 3:25 PM0 commentsViews: 1

विनोद तळेकर, मुंबई

27 मार्च

सोमवारी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात घरगुती वापरासाठी गॅसच्या दरात वाढ केल्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. विरोधकांबरोबरच सत्ताधानीसुद्धा या दरवाढीला विरोध केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एलपीजी गॅसवर पाच टक्के करवाढ प्रस्तावित केली. त्यावर राज्यभरात नाराजीचा सूर दिसून आला.

आज विधिमंडळातही विरोधक आक्रमक झाले. त्यांनी विधिमंडळाच्या पायर्‍यावंर घोषणाबाजी केली. दरवाढीच्या मुद्यावरून विरोधकांच्या विरोधात सत्ताधार्‍यांही सुरु मिसळले. काँग्रेसचे नेते तर थेट दरवाढ मागे घ्यावी यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारात दाखल झाले.पण त्या आगोदर सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षातर्फे घरगुती गॅसची दरवाढ मागे घेण्याचा ठराव पास करत काँग्रेस पक्षावर कुरघोडी केली. विरोधकांबरोबर सत्ताधार्‍यांनीही विरोध केल्याने गॅस दरवाढ अर्थमंत्र्यांना मागे घ्यावी लागणार अशी शक्यता आहे. बजेटवर अजित पवार जेव्हा उत्तर देतील तेव्हा याची घोषणा केली जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

close