पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई

March 28, 2012 3:31 PM0 commentsViews: 46

28 मार्च

पिंपरी चिंचवड प्राधिकरणाच्या आरक्षित जागेववर अतिक्रमणे हटवण्याची कारवाई आज तिसर्‍या दिवशीही सुरु आहे. 200 पोलिसांच्या बंदोबस्तात आज पिंपरीतील काळेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटवण्याच्या आजच्या कारवाईत 5 ते 6 मजली इमारतही जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईला विरोध करणार्‍या नागरिकांवर पोलिसांनी लाठीमारही पोलिसांनी केला आहे. पण आपण करत असलेले बांधकाम अधिकृत असून त्यासाठीच्या सर्व परवानग्या घेतल्या असल्याच नागरिकांच म्हणणं आहे. दरम्यान, ही कारवाई थांबवण्यासाठी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्या प्राधिकरणाच्या कार्यालयावर एका मोर्चाचे आयोजन केले आहे.

close