मराठवाड्यात वाढतंय सिमीचं जाळं !

March 28, 2012 5:05 PM0 commentsViews: 9

28 मार्च

मराठवाड्यामध्ये सिमी संघटनेच्या अतिरेक्यांनी तळ ठोकायला सुरुवात केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येतेय. मंगळवारी बुलढाणा इथ पकडण्यात आलेला अखिल खिलजी हा सीमीचा मास्टरमाईंड आहे. शिवाय त्याच्याबरोबर पकडण्यात आलेल्या 4 जणांनी मराठवाडयातील सीमीचं संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केला होता.

आज दिल्लीमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून स्फोटके, डिटोनेटर्स आणि टायमर जप्त करण्यात आली. यासिन भटकळचा साथीदार असल्याचं तपासातून पुढ येतंय. जामा मशीद, चिन्नास्वामी स्टेडियम आणि जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात याच प्रकारच्या मॉड्यूल वापरलं गेल होतं. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रेहमान उर्फ दिलकश असं नाव आहे. दिलकश हा ऍम्बी व्हॅलीत कामाला होता. तिथं तो सुपरवायझर म्हणून कामाला होता. त्यानंतर त्यानं मुंबईत कुर्ला इथं एका फॅक्टरीत काम केलं होतं. नंतर तो मुंबई सोडून नेपाळला गेला आणि त्यानंतर दिल्लीत परतला अशी माहिती मिळतेय.

बुलढाण्यामध्ये पकडण्यात आलेला हा अखिल मोहमद खिलजी. 45 वर्ष वयाचा खिलजी सीमी संघटनेचा मास्टरमाईंड मानला जातो. खिलजीबरोबरच त्याचा मुलगा खलील खिलजी, मोस्ट वाँटेड मोहमद अब्रार, औरंगाबादमध्ये मारला गेलेला अजहर आणि त्याचा साथीदार मोहम्मद हुसेन. हे 5 जण, मराठवाड्यामध्ये संघटना वाढवणे आणि त्यासाठी लागणार पैसा जमा करण्याचं काम करत होते. हे सर्व जण मध्यप्रदेशातल्या खांडवा इथले रहिवासी आहेत. 2008 पासून वाँटेड असल्यानं त्यानी महाराष्ट्रामध्ये पाऊल टाकलं.

मध्यप्रदेश पोलिसांना आणि एटीएसला हवा होता तो अखिल खिलजी आणि मोहमद अब्रार. तो धोका टाळण्यासाठी त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण वाटलं ते मराठवाडा. शिवाय मराठवाडयातूनच त्यांना विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्येही काम करणं सोप होतं. पण त्याचा प्रयत्न एटीएस हाणून पाडला

प्रक्षोभक भाषण देऊन तरुणांना एकत्र करणं, पैसा जमा करण्यासाठी लूटमार, हत्या करणे ही प्रमुख कामं आणि सिमी संघटना वाढवण्याची जबाबदारी अखिल खिलजीवर होती.

अखिलच्या कुटुंबातील सदस्यावर मध्यप्रदेशमध्ये 20 पेक्षा अधिक गुन्हे आहेत. शिवाय त्याच्याबरोबर काम करणारा आणि एटीएसने खात्मा केलेल्या अजहरच्या कुटुंबातील 4 जणही सिमीचं काम करतात. धक्कादाय बाब म्हणजे त्यांना मराठवाडयातील स्थानिकांचीही मदत होत असल्याचं आता समोर येतंय.

एटीएसच्या कारवाईमुळे महाराष्ट्रात अतिरेकी कारवायांचा धोका काही प्रमाणात टळला. पण या 5 जणांशिवाय आणखी सीमीचे किती कार्यकर्ते महाराष्ट्रात कार्यरत आहेत याचा शोध घेणं महत्वाचं ठरणार आहे.

close