भाभा सेंटरमध्ये केली 25 वेळा अतिरेक्यांची घुसखोरी !

March 28, 2012 5:23 PM0 commentsViews:

28 मार्च

भारताचा प्रमुख अणु केंद्र असलेल्या भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमध्ये म्हणजे बीएआरसी (BARC) मध्ये गेल्या दोन वर्षात तब्बल 25 वेळा घुसखोरी झाल्याची माहिती मिळतेय. यामुळे अतिसंवेदनशील भाग असलेल्या बीएआरसीच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 26/11 च्या हल्ल्यामागे हात असणार्‍या डेव्हिड कोलोमन हेडलीनंही बीएआरसीची पाहणी केली होती.भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर… अणु संशोधनाचं देशातील एक प्रमुख केंद्र..सध्या अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. मुंबईत 26-11 चा हल्ला घडवणारा डेव्हिड कोलमन हेडलीनंही या ठिकाणची रेकी केली होती. मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर इथली सुरक्षा वाढवण्यात आली असली तरी गेल्या दोन वर्षात बीएआरसीमध्ये 25 वेळा घुसखोरी झाल्याचं गुप्तचर विभागानं सांगितलंय. गुप्तचर विभागाचा इशारा

- बीएआरसीमध्ये 2010मध्ये 10 वेळा घुसखोरी झाली – तर 2011 मध्ये 15 वेळा घुसखोरी झाली.- बीएआरसीजवळ असलेल्या किनारपट्टीवरुन आणि केंद्राच्या वेगवेळ्या एन्ट्री प्वाईंट्समधून ही घुसखोरी झालीय. – गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये बीएआरसीच्या जवळच असलेल्या किनार्‍यावजवळ एक अज्ञात बोट आढळल्याने खळबळ माजली होती. – अनेकवेळा बनावट ओळखपत्र दाखवून बीएआरसी कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश मिळवण्यात आला. – नोव्हेंबर 2011मध्ये स्पाय कॅमरा बाळगणार्‍या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती- शेकडो शास्त्रज्ञांसाठी असलेल्या रहिवाशी भाग हा अत्यंत संवेदनशील आहे. बीएआरसी सुरक्षेतील त्रुटी – अणुऊर्जा आयोग आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल दोघांकडेही बीएआरसीच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.- पण दोघांमध्येही समन्वयाचा अभाव आहे. – बीएआरसीच्या आसपास दोन मोठ्या झोपडपट्‌ट्या आहेत. त्यामुळेही सुरक्षेला मोठा धोका आहे.- त्याशिवाय काही एन्ट्री पाईंट्स आणि ड्रेनेज आउटलेटवर कसलीच सुरक्षा नाही

हेडलीनं बीएआरसीची रेकी केली. त्याला 2009 साली अटक झाली. पण कदाचीत त्याआधीच बीएआरसीची अतिशय गोपनीय अशी माहिती अतिरेक्यांपर्यंत पोचली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

close