शासकीय उदासीनतेचा बोल्डावाडीला फटका !

March 29, 2012 12:08 PM0 commentsViews: 26

कन्हैया खंडेलवाल, हिंगोली

29 मार्च

हिंगोली जिल्हातील बोल्डावाडी गाव सध्या शासकीय उदासीनतेचा फटका सहन करतंय. जिल्हातील बोल्डावाडी गाव, देशातील पहिलं इकोटेक व्हिलेज अशी गावाची ख्याती. गाव बांधून दोन वर्षानंतर आदिवासींना घराचं वाटप झाल खरं..मात्र गावापुढच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. विद्युतपुरवठा सुरु न झाल्यामुळे गाव अंधाराखाली गेलंय.

गावात मध्यवर्ती गोबर गॅस प्लॅन्ट आहे, मात्र गावकर्‍यांना गॅस मिळालेला नाही. पाणीपुरवठा बरोबर होत नसल्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई आहे.गाव बांधणीच्या मुळ उद्देशाला सरकारने हरताळ फासल्याचं आदिवासी संघटनाचं म्हणणं आहे. सरकारी उदासीनतेमुळे अभिनव योजनांचा कसा बोजवारा उडतो याचं मुर्तीमंत उदाहरण बोल्डेवाडी आहे.

close