लष्करप्रमुखांच्या पत्राची आयबी चौकशी

March 29, 2012 9:23 AM0 commentsViews: 1

29 मार्च

लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांच्या पत्र फुटी प्रकरणाच्या आयबीने चौकशीला सुरुवात झाली आहे. संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी यांनी आज ही माहिती दिली. तसेच भारताची सुरक्षा तयारी परीपूर्ण असल्याचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. तिन्ही सेनाप्रमुखांवर सरकारचा पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहीलेलं पत्र फुटल्याप्रकरणी आता लष्करप्रमुख यांनी सरकारलाच जाब विचारला. पंतप्रधानांना लिहीलेलं पत्र फुटलं कसं असा सवाल त्यांनी केला. तसेच हा आपली मानहानी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही व्हि.के.सिंग यांनी केला.

close