आमदारांच्या खोट्या सह्यांवर प्रश्न केले – गोर्‍हे

March 29, 2012 4:12 PM0 commentsViews: 5

29 मार्च

विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी दलालांमार्फत भ्रष्टाचार होत असल्याची गंभीर बाब समोर येतेय. आमदारांच्या खोट्या सह्या करुन कार्यक्रम पत्रिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं उघड झालंय. शिवसेना आमदार निलम गोर्‍हे यांनी हा सर्व प्रकार उघड केला. सभापतींनी याची गंभीर दखल घेत सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहे. गेल्या सत्रात अशा प्रकारे खोट्या सह्या करुन 25 प्रश्न कार्यक्रम पत्रिकेवर आल्याचं गोर्‍हेंनी सांगितलंय.

close