शिवसेना-भाजपचे 14 आमदार निलंबित

March 30, 2012 9:13 AM0 commentsViews: 1

30 मार्च

दिवेआगरमधील सोन्याची गणेशमूर्ती चोरीला जाऊन आठवडा उलटून गेला तरी या प्रकरणी एकही आरोपी अजूनपर्यंत पकडला गेला नाही. तसेच गणेशाची सोन्याची मूर्तीही अजून सापडली नाही. याचा निषेध करण्यासाठी आज विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांनी गणेशाची मूर्ती घेऊन विधानभनवात प्रवेश केला आणि घंटानाद केला. या प्रकरणी विरोधी पक्षाचे 14 आमदारांना निलंबित करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या 13 आणि भाजपच्या 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. दिवेआगारच्या प्रश्नावरून गोंधळ घातल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, महादेवबाबर, ज्ञानराज चौगुले, संजय गावंड, डॉ. बालाजी किणिकर, कॅप्टन अभिजित अडसूळ, चंद्रकांत मोकाटे, सुजित मिंचेकर, विनोद घोसाळकर, राजन विचारे , बालाजी किनीकर, दौलत दरोडा, यां शिवसेनेच्या आमदारांचा समावेश आहे. तर बीजेपीच्या राम शिंदेनाही निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, 14 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईचा मनसेनंही निषेध केला आहे. पण शिवसेना आमदारांनी विधानसभेत गणेशमूर्ती आणून केलेलं आंदोलन अयोग्य असल्याची टीकाही मनसेचे गटनेता बाळा नांदगावकर यांनी केली.

close