युवासेनेचे 8 सिनेट सदस्य निलंबित

March 29, 2012 11:02 AM0 commentsViews: 1

29 मार्च

मुंबई विद्यापीठ गोंधळप्रकरणी युवा सेनेच्या 8 सिनेट सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पीय चर्चेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी हा आदेश दिला आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. काळ्या टोप्या घालून युवासेनेनं कुलगुरुंचा निषेध केला. तसेच परिक्षा केंद्रातील सावळा गोंधळ आणि हॉल तिकीट प्रश्नावरुन गोंधळप्रकरणी कुलगुरु राजन वेळुकर यांच्या हकालपट्टीची मागणी युवासेनेनं केली होती.

close