आनंद नाडकर्णी यांचं मानसोपचार केंद्र सील

March 29, 2012 11:22 AM0 commentsViews: 62

29 मार्च

प्रख्यात मानसोपचार तज्ञ आनंद नाडकर्णी यांचं ठाण्यातील मानसोपचार केंद्र महानगरपालिकेनं सील केलं आहे. पण ही कारवाई नियमांविरुध्द आहे. महापालिका प्रशासनाने सुडबुध्दीने ही कारवाई केली असा आरोप नाडकर्णी यांनी केला. आयपीएच अर्थात इनस्टिट्युट फॉर सायकॉलॉजिक हेल्थ हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं मानसोपचार कें द्र आहे. ठाणे आयुक्त आर राजीव यांनी ही कारवाई केली आहे. थकीत मालमत्ता करापोटी ही कारवाई केल्याचं पालिकेच्या अधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

close