लोकलचा फर्स्ट क्लासचा प्रवास 15 रुपयांनी महागला

March 29, 2012 11:33 AM0 commentsViews: 7

29 मार्च

महागाईचे चटके सोसणार्‍या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखी एक चटका दिला आहे. मुंबईतील लोकल प्रवाशांवर दरवाढीचा बोजा वाढणार आहे. आता यापुढे फर्स्ट क्लास पास आणि तिकीट महागणार आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. पुढच्या महिन्यापासून पासवर कमीत-कमी 15 रुपयांची दरवाढ होणार आहे. प्रत्येकी 10 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडेवाढ होणार आहे. यामुळे दादर ते सीएसटीसाठी अगोदर 240 रुपये मोजावे लागत होते आता 255 रुपये द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेलाईनवर चर्चगेट ते विरार 780 रुपये द्यावे लागत होते आता 870 रुपये द्यावे लागणार आहे.पण सेकंड क्लासच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

किती शिल्लक पैसे मोजावे लागतील ?

दादर ते सीएसटीसाठी अगोदर 240 रुपये, आता 255 रुपये चर्चगेट ते विरार 780 रुपये , आता 870 रुपये चर्चगेट ते बोरीवली 480 रुपये, आता 535 रुपयेसीएसटी ते कल्याण 720 रुपये, आता 805 रुपयेसीएसटी ते डोंबिवली 660 रुपये, आता 735 रुपये सीएसटी ते वाशी 420 रुपये, आता 465 रुपयेसीएसटी ते पनवेल 660 रुपये, आता 735 रुपये

close