हिरानंदानींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

March 30, 2012 10:54 AM0 commentsViews: 4

30 मार्च

सरकारी नियमाप्रमाणे बांधकाम न केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज हिरानंदानींना दणका दिला. मुंबई हायकोर्टाने हिरानंदानींवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात हिरानंदानींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. आता एमएमआरडीए हिरानंदानींवर गुन्हे नोंदवण्याची प्रकिया सुरू करू शकते.

मुंबई येथील हिरानंदानी बिल्डर्स यांना पवईमध्ये बांधकाम करायला हायकोर्टाने या अगोदरच मनाई केली आहे. हिरानंदानी यांनी तिथं सरकारी नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका मुंबई हायकोर्टाने ठेवला. याच बरोबर 400 आणि 800 स्क्वेअर फुटाचे प्रत्येकी पंधराशे घरं बांधून ते मध्यमवर्गीयांना देण्याचे आदेश हायकोर्टाने हिरानंदानींना दिले होते. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासाठी हिरानंदानी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र तिथंही कोर्टाने दिलासा दिला नाही.

close