इंदू मिलच्या जागेसाठी भीमसैनिक पुन्हा रस्त्यावर

March 30, 2012 11:03 AM0 commentsViews: 24

30 मार्च

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकरची संपूर्ण जागा देण्यात यावी यासाठी आज रिपाइं गवई गटाच्या वतीने आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला. रिपाइं नेते राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. 14 एप्रिलपर्यंत इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरीत न झाल्यास राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राजेंद्र गवई यांनी दिला.

close