उपचार सुरु असतानाच रुग्णाला बाहेर काढले

March 30, 2012 11:30 AM0 commentsViews: 3

30 मार्च

ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये एका रूग्णासोबत अतिशय लाजिरवाणा प्रकार घडला आहे. अपघातात जखमी झालेले प्रकाश शिंदे हे या अपघातात 50 टक्के जळाले होते. त्यांच्यावर मागील 9 दिवसांपासून सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच केवळ दुसर्‍या रुग्णाला जागा देण्यासाठी प्रकाश शिंदे यांना हॉस्पिटलमधून उपचार सुरू असतानाच हाकलून देण्यात आलं. हॉस्पिटलच्या बाहेर त्यांना रडताना पाहून त्यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी, तेथील काही नागरिकांनी पुढाकार घेतला. पण प्रकाश शिंदे यांच्याकडे उपचारासाठी 5 हजार रूपये नसल्याचे कारण देऊन हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना परत दाखल करून घेण्यास टाळाटाल करीत होते. याप्रकरणात माध्यमांनी दखल घेतली असता प्रकाश शिंदेंना परत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

close