ठाण्यात तुळजाभवानी मंदिरात चोरीप्रकरणी एकाला अटक

April 1, 2012 11:29 AM0 commentsViews: 3

01 एप्रिल

ठाण्यातल्या पाचपाखाडी परिसरात असणार्‍या तुळजाभवानी मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाखाचे दागिने जप्त केले आहेत. संतोष गुळेकर असं या आरोपीचं नाव आहे. सकाळी चोरट्यांनी देवीचे दागिणे लंपास केले हे कळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या 5 तासात आरोपीला अटक केली. दोनच आठवड्यापूर्वी दिवेआगारच्या सुवर्णगणेश मूर्ती चोरी झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना भाजपने विधानसभेत महाआरतीकरून 14 आमदारांचे निलंबन ओढावून घेतले या सर्व घटनामध्ये पुन्हा एकदा ठाण्याच्या महाकाली मंदिरातही चोरी झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

close