..तर राजकारण सोडेन -ओमर अब्दुल्ला

November 23, 2008 1:06 PM0 commentsViews: 5

23 नोव्हेंबर, श्रीनगरमुफ्ती इस्लाह जम्मू काश्मीरमधील प्रचार आता मालेगाव स्फोटामधल्या राजकारणाभोवती फिरताना दिसतोय. पीडीपीच्या नेत्यांनी ओमर अब्दुल्ला यांचे संबंध मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी स्वामी दयानंद पांडे यंाच्याशी होते, असा आरोप केलाय. अब्दुल्ला यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. हे आरोप सिद्ध झाले, तर राजकारण सोडू, असा इशाराही ओमर अब्दुल्ला यांनी दिलाय.नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्लांवर हा आरोप पीडीपीचे वरिष्ठ नेते तारीक कार यांनी केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी स्वामी दयानंद पांडे एकत्र असल्याचा एक फोटो त्यांनी समोर आणलाय. ' ओमर अब्दुल्ला आणि पांडे यांच्यात काय संबंध आहेत, हे आम्हाला नॅशनल कॉन्फरन्सकडून जाणून घ्यायचंय. हरिद्वारच्या दयानंदच्या मठात ओमर काय करत होते. तो त्यांचा आशीर्वाद घेत होता की आणखी काय करत होता, ते जाणून घ्यायचंय ', असं तारीक कार यांचं म्हणणं आहे. हे सगळे आरोप निराधार आहेत. पीडीपी नेते कार आणि मेहबूबा मुफ्ती हे सुडाचं राजकारण करताहेत, असा पलटवार ओमर अब्दुल्ला यांनी केलाय. ' मी कुठल्याही चौकशीला तयार आहे. सीबीआय किंवा संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीलाही तयार आहे. माझा आणि पांडेचा कुठलाही संबंध असल्याचं सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन ' असं ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलंय. पीडीपीनं हा मुद्दा त्यांच्या प्रचारादरम्यान चांगलाच उचललाय. त्यांनी केवळ नॅशनल कॉन्फरन्सच नाही, तर काँग्रेस आणि माजी राज्यपाल एस. के. सिन्हा यांच्यावरही तोफ डागलीय. ' सिन्हांच्या काळात पांडेला सगळ्याच सुविधा मिळायच्या. आता मला विचारायचं की हा पवित्रा काँग्रेसनं की गुलाम नवी आझाद यांनी घेतलाय ', असं सवाल मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. काश्मीरच्या निवडणुकीत आता हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून दोन प्रमुख पक्षामध्ये चांगलीच जुंपलीय. पण काश्मीरच्या निवडणुकीशी हे मुद्दे किती पॉवरफुल ठरणार, हे आता मतदारच ठरवतील.

close