आजपासून गोव्यात फक्त 55 रु. लिटर पेट्रोल

April 1, 2012 12:46 PM0 commentsViews: 1

01 एप्रिल

आजपासून गोव्यात एक लिटर पेट्रोल फक्त 55 रुपयांना मिळणार आहे. निवडणुकीत दिलेलं आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पूर्ण केलं. त्यामुळे गोवेकर भाजप सरकारवर खुश आहे. पेट्रोल तब्बल 11 रुपयांनी स्वस्त केलंय. महाराष्ट्रात 70 रुपयांनी मिळणारे पेट्रोल गोव्यात 55 रुपयांना मिळणार आहे. पण हे पेट्रोल इतके स्वस्त कसे करण्यात आले यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. पेट्रोलवर व्हॅट कमी केल्यामुळे ही कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र पेट्रोलवरचा व्हॅट कमी केल्यामुळे गोव्याच्या तिजोरीत सुमारे 168 कोटी रुपयांची तुट भरुन काढण्यासाठी नेमके पर्याय शोधुन काढले आहे. पेट्रोलचे दर स्वस्त झाल्यामुळे गोवासरकारपुढे पेट्रोल स्मगलींगचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पर्रिकर यांनी खबरदारी म्हणून संरक्षण यंत्रणेला सतर्क केले आहे.

close