झारखंडमध्ये भाजपमधील मतभेद टोकाला

March 30, 2012 5:36 PM0 commentsViews: 2

30 मार्च

झारखंड राज्यसभा निवडणुकीवरुन भाजपमधील मतभेद समोर आले आहेत. झारखंडमधून भाजप उमेदवार अंशुमन मिश्रा यांनी माघार घेतल्यानंतर पक्षाच्या आमदारांनी मतदानात सहभागी होऊ नये असे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने दिले होते. पण भाजप आमदारांनी मित्र पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवारांना मतदान केलं. भाजप आमदारांनी मतदान करु नये, यावर सुषमा स्वराज ठाम होत्या. पण मतदानानंतर पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी मात्र त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपमधला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. दरम्यान, घोडेबाजाराला ऊत आल्याचं सांगत निवडणूक आयोगानं झारखंड आणि उत्तराखंड या दोन राज्यातल्या राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी थांबवली.

close