रिक्षा युनियनची सुप्रीम कोर्टात धाव ; संपाचा इशारा

April 1, 2012 1:05 PM0 commentsViews: 2

01 एप्रिल

मुंबई हायकोर्टाने इलेक्ट्रॉनिक मिटरप्रकरणी ऑटो युनियनची याचिका फेटाळल्यानंतर आता युनियन सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. रिक्षाचं भाडं हे महागाईवर आधारित असावे अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. कामगार नेते शरद राव यांनी ही मागणी केली. रिक्षाचे किमान भाडं हे 11 रुपयांऐवजी 16 रुपये करावं आणि त्यापुढे प्रत्येक किलोमीटरसाठी 7 रुपयांऐवजी 9 रुपये आकारावे, अशी रिक्षा युनियनची मागणी आहे. तसंच 16 तारखेपासून संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला. मुंबई हायकोर्टाने रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मिटर बसवणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सर्व रिक्षांना एका वर्षाच्या आत इलेक्ट्रॉनिक मिटर बसवून घेण्यात सांगण्यात आले आहे.

close