पंजाबच्या केंद्रीयमंत्री जागीर कौर यांना 5 वर्षाची सक्त मजुरी

March 30, 2012 5:38 PM0 commentsViews: 4

30 मार्च

पंजाबच्या मंत्री बीबी जागीर कौर यांना चंदिगड कोर्टाने 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. आपल्याचं मुलीचं बळजबरीनं गर्भपात केल्याच्या आरोपात कोर्टाने कौर यांना दोषी ठरवलं आहे. पण मुलीच्या हत्येच्या आरोपातून त्यांची मुक्तता झाली. बीबी जागीर कौर यांची मुलगी हरप्रीत हिने आईच्या मर्जीविरोधात लग्न केलं होतं. त्यामुळे संतापलेल्या कौर यांनी बळजबरीने तिचा गर्भपात केला होता. त्यानंतर 2000 साली हरप्रीतचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

close