आता शहरी भागातही तंटामुक्ती योजना राबवणार – गृहमंत्री

April 1, 2012 2:23 PM0 commentsViews: 6

01 एप्रिलग्रामीण भागानंतर आता शहरी भागातही तंटामुक्ती योजना राबवणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर आर पाटील यांनी नांदेडमध्ये केली. त्याचबरोबर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता दोन वर्षाचा होणार असल्याचही आर आर पाटलांनी सांगितलं. एवढंच नाही तर राष्ट्रवादीमध्ये आता कोणताच तंटा नाही आणि काँग्रेसबरोबरचे मराठवाड्यातील अर्तंगत तंटा मिटल्याने त्याचा राष्ट्रवादीला अभिमान आहे. अशी कोपरखळीही आर आर पाटलांनी अशोकराव चव्हाणांना मारली.

close