खंडणीसाठी मित्राने केली मित्राची हत्या

April 1, 2012 9:46 AM0 commentsViews: 2

01 एप्रिल

पुण्यात 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत शिकणार्‍या एका मित्राने आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम शिर्के असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शुभम हा प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. शुभमच्या हत्येप्रकरणी शुभमचा मित्र अमित नायर यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलं आहे. शुभमला त्याच्या मित्रांनी काल फोन करून दिघी जवळ बोलावून घेतले. नंतर जवळच्या जंगलात नेऊन त्याचा पट्‌ट्याने गळा दाबून खून केला. त्याआधी शुभमच्या वडिलांकडून त्यांनी 15 हजारांची खंडणी वसूल केली होती. तुमचा मुलगा तुम्हाला मिळेल असं त्यांनी सांगितलं. मात्र शुभम रात्रीनंतरही घरी परत न आल्याने शेवटी वडिलांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता हा प्रकार उघडकीस आला.

close