रामनवमीनिमित्त शिर्डीत साईभक्तांची गर्दी

April 1, 2012 10:36 AM0 commentsViews: 6

01 मार्च

'जय श्रीराम'च्या घोषणा देत आज लाखो भक्त शिर्डीत दाखल झाले आहे. शिर्डीत रामनवमी उत्सव सुरु झालाय. काहीदिवसांपूर्वी शिर्डीच्या विश्वस्त मंडळाला घेऊन सुरू असलेल्या राजकारणाचा भक्तांवर काहीही परिणाम झालेला नाही. साईंच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहे. विविध भागातून काल संध्याकाळपासून भक्तांनी शिर्डीकडे कुच केली होती. पदयात्रा,दिंड्या घेऊन भक्त शिर्डीत मोठ्या संख्येनं दाखल होतं आहे. राज्यात अनेक ठिकाणी रामनवमीनिमित्त महाभंडार्‍यांचे आयोजनही करण्यात आले आहे.

close