‘म्यानमारमध्ये स्यू की यांचा विजय निश्चित’

April 1, 2012 5:36 PM0 commentsViews: 3

01 एप्रिल

म्यानमारमध्ये आज ऐतिहासिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत लोकशाहीवादी कार्यकर्त्या आँग सान स्यू की यांचा मोठ्या मतानं विजय झाल्याचं त्यांचा पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीतर्फे सांगण्यात आलंय. याशिवाय एकूण 45 मतदारसंघांपैकी 12 जागी पक्षाचा विजय झाल्याचंही सांगितलं जातंय.पण अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या मतमोजणी सुरु आहे. म्यानमारमध्ये गेल्या वीस वर्षात पहिल्यादांच मध्यावधी निवडणूक होतेय. या निवडणुकीत मतदारांनीही भरभरुन मतदान केलंय. फक्त 5 तासात 70 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

close