केंद्रीय मंत्र्यांची केजरीवाल यांना नोटीस

April 1, 2012 5:38 PM0 commentsViews: 6

01 एप्रिल

केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध अनुद्गार काढणार्‍या टीम अण्णांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. केंद्रीय मंत्री विरभद्र सिंग यांनी अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या वेळी केजरीवाल यांनी विरभद्र सिंग यांना कपटी म्हटलं होतं. केजरीवाल यांनी माफी मागावी,असं पत्र सिंग यांनी गेल्याच आठवड्यात केजरीवाल यांना लिहलं होतं. पण त्यावर काहीच उत्तर न आल्याने सिंग यांनी आता कायदेशीर नोटीस बजावलीय. दरम्यान,रामनवमीच्या दिवशी अण्णांनीही भ्रष्टाचाररुपी रावणाचं निर्दालन करण्याचं आवाहन केलंय.

close