रिक्षाचालकांच्या मुजोरीला चाप, ई मीटर सक्तीचे !

April 1, 2012 10:57 AM0 commentsViews: 4

01 एप्रिल

ग्राहकांशी अरेरावी, भाडेवाढीसाठी अचानक पुकारलेला संप, मर्जीप्रमाणे भाडे स्वीकारणे अशा रिक्षाचालकांच्या मर्जीला आता लगाम बसणार आहे.आता मुंबईत रिक्षांना ई मीटर बसवणं आता बंधनकारक होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचं नको, अशी याचिका ऑटो युनियनने दाखल केली होती. ती याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यासाठी रिक्षाचालकांना एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. रिक्षा परवाना नुतनीकरणाच्यावेळीही रिक्षाचालकांना आता इलेक्टॉनिक मीटर बसवता येणार आहे.

close