पुणे महापालिकेची ‘गोल्डन वसुली’

April 2, 2012 9:57 AM0 commentsViews: 2

02 एप्रिल

'पुणे तिथं काय उणे' असं बिरूद मिरवणार्‍या पुणे शहरावर आज एक नवा विक्रम जमा झाला आहे. राज्यातल्या सर्व महापालिका मिळून सोन्या -चांदीवर जेवढं जकातीचं उत्पन्न मिळतं त्यापेक्षा जास्त उत्पन्न एकट्या पुणे महापालिकेनं मिळवून नवा विक्रम केला आहे. 2011-12 या आर्थिक वर्षात पुणे महापालिकेने तब्बल 19 कोटी 33 लाख एवढी जकात केवळ सोन्या-चांदीवर मिळवली आहे. यावर्षी प्रशासनाने 1200 कोटी रूपयांचं उद्दीष्ट ठरवलं होतं. पण जकात विभागाने उद्दीष्टापेक्षा 55 कोटी रुपये जास्त जकात जमा केलीय. याचसोबत दारू आणि सिगरेटवर 63 कोटी, गुटख्यावर 1 कोटी, मोबाईल्सवर 33 कोटी रूपये जकात ही पुणेकरांच्या बदलत्या लाईफस्टाईलवरही प्रकाशझोत टाकतेय.

close