महसूल कर्मचार्‍यांचं कामबंद आंदोलन सुरुच

April 3, 2012 7:51 AM0 commentsViews: 4

03 एप्रिल

रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महसूल कर्मचार्‍यांच काम बंद आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरु आहे. आरोपींना अटक करेपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्यांचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. वाळू माफियांनी रोह्याच्या तहसिलदारांवर हल्ल्याचा प्रयत्नाचा निषेध करत आरोपीला अटक करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तहसिलदार गणेश सांगळेंवर हल्ला झाला होता. यात राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष नितीन परब यांच्यावर आरोप असून रोहा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

close