‘बेस्ट’चा प्रवास महागला

April 2, 2012 11:45 AM0 commentsViews: 5

02 एप्रिल

महागाईला कंटाळलेल्या सर्वसामान्य जनतेला आता 'बेस्ट' ने धक्का दिला आहे. बेस्टच्या प्रवासात एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे कमीतकमी 4 रुपयांचे असलेल्या तिकीटासाठी पाच रुपये मोजावे लागणार आहे. आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षाभरापासून ही भाडेवाढ रोखून धरण्यात आली होती. अखेर मार्च महिन्यासंपल्यानंतर बेस्टने 1 रुपयाने भाडेवाढ केली आहे. तसेच एसी बसेसच्या दरातही टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

'बेस्ट' भाडेवाढ

एसी बसचं भाडं

10 वरून 15 रूपये15 वरून 20 रूपये

जलद एसी बसचं भाडं

15 वरून 25 रूपये20 वरून 30 रूपये

close