मी मनसेतच राहणार – हर्षवर्धन जाधव

April 3, 2012 10:03 AM0 commentsViews: 1

03 एप्रिल

औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे नाराज आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आपले सगळे गैरसमज दूर झाल्याचे सांगत आपण पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केलं. जिल्हा परिषदेतच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ता समीकरणानंतर हर्षवर्धन जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. काल सोमवारी हर्षवर्धन जाधव शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली होती याबाबत जाधव संध्याकाळी पत्रकारपरिषद घेऊन घोषणा करतील अशी शक्यता निर्माण झाली होती. पण राज ठाकरे यांनी फोन करून मुंबईला भेटायला बोलावून घेतल्यामुळे सेनेत प्रवेश टळला. आज जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर आता आपले सगळे गैरसमज दूर झाल्याने आपण पक्ष सोडणार नसल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केलं.

close