वाळू माफियाच्या निषेधार्थ महसूल कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

April 2, 2012 12:45 PM0 commentsViews: 1

02 एप्रिल

रायगड जिल्ह्यात वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. आज तर रोह्यामध्ये अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करणार्‍या तहसिलदार गणेश सांगळे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष नितिन परब यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सांगळे यांनी केला. रोहा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. दरम्यान, राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष नितिन परबना निलंबित करण्याची सुनील तटकरेंनी घोषणा केली आहे.

close