लावणीसम्राज्ञी यमुनाबाईंना माणिक वर्मा पुरस्कार

April 2, 2012 12:51 PM0 commentsViews: 8

02 एप्रिल

लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकरांच्या लावणीची अदा…तो जुना काळ अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली. निमित्त होतं भारत गायन समाजातर्फे दिल्या जाणार्‍या पुरस्काराचं… यमुनाबाई वाईकरांचा माणिक वर्मा पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं. प्रभाकर करंदीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. देवगंधर्व भास्करबुवा बखले यांच्या 90व्या पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुयोग कुंडलकर यांचाही सत्कार करण्यात आला. यानिमित्त यमुनाबाईंची खास दुर्मिळ चित्रफीत पाहण्याती संधीही यानिमित्त रसिकांना मिळाली.

close