क्राईम सिरियलवर बंदी आणा !

April 3, 2012 11:46 AM0 commentsViews: 2

03 एप्रिल

पुण्यात शुभम शिर्केच्या हत्येचा मुद्दा आज विधानपरिषदेत गाजला. काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. शिर्के कुटुंबीयांनी पोलिसांना आगाऊ माहिती दिली होती. पण पोलिसांनी कारवाई करण्यास विलंब लावला असं मोहन जोशी यांचं म्हणणं होतं. तर प्रक्षोभक जाहिरातींमुळे आणि सीआयडी सारख्या सिरियलमुळे अशी पावलं मुलं उचलतात त्यामुळे अशा जाहिराती आणि सिरियलवर बंदी आणावी अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली. यावर पोलीस कारवाईची चौकशी केली जाईल आणि जाहिराती तपासल्या जातील असं उत्तर गृहमंत्री आर आर पाटील यांनी विधान परिषदेत दिले.

close