खेळा बिनधास्त,पास होणार हमखास !

April 2, 2012 3:22 PM0 commentsViews: 5

02 एप्रिल

10 वी आणि 12 वीची परीक्षा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचं टर्निंग पाईंट…पण हा 'टर्निंग' घेण्यासाठी करावी लागते अभ्यासाची पराकाष्टा चांगले मार्क मिळाले तर पुढेचे चित्र आणखी स्पष्ट होते. पण आता राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळात यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेत मिळणारे स्पोर्ट्सचे 25 मार्क्स यापुढे केवळ पास होण्यासाठीच गृहीत धरले जातील असं शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानपरिषदेत जाहीर केलं. याचाच अर्थ 10 वी, 12 वीमध्ये एखादा खेळाडू विद्यार्थी नापास होत असेल तर स्पोर्टसचे 25 मार्क्स मिळवून तो पास होऊ शकेल. स्पोर्टस्‌च्या विद्यार्थ्यांना खेळ आणि शिक्षण घेत असताना तारेवरीची कसरतच करावी लागते. आता शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज खेळाचे 25 मार्क त्यामुळे आता 'खेळा बिनधास्त आणि पास होणार हमखास' असंच म्हणावं लागणार..

close