महानिर्मिती कंपनीचे 13 हजार कोटींचे नुकसान – फडणवीस

April 3, 2012 12:02 PM0 commentsViews: 6

03 एप्रिल

ग्रेड स्लीपेजमुळे महानिर्मिती कंपनीचे 13 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला आहे.राज्याच्या वीजनिर्मिती विभागाला कोळशाचा ठराविक कोटा दिला. गेल्या वर्षभरात ठराविक कोट्यापैकी 60 टक्के कोटा महानिर्मिती उचलू शकली. याचाच अर्थ 40 टक्के कोटा मार्च अखेरपर्यंत वाया गेला आहे. हा कोटा भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून कोळसा खरेदी करावी लागली. प्रतिटन 2600 रुपये इतक्या चढ्या दराने खरेदी केली. त्यामुळे तीन हजार कोटींचे प्रत्येक वर्षी नुकसान झाले. गेल्या 5 वर्षांत हलक्या प्रतिचा कोळसा घेण्यासाठी जास्त पैसे मोजले.

close