बाळासाहेब ठाकरे यांना जीवनगौरव पुरस्कार

April 3, 2012 2:43 PM0 commentsViews: 4

03 एप्रिल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. कार्टुन वॉच या पत्रिकेच्या वतीने बाळासाहेबांना व्यंगचित्रकारीतेतल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन येत्या 29 एप्रिलला मुंबईत होणार आहे.लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद असलेल्या कार्टुन वॉचचा येता अंक हा बाळासाहेबांच्या व्यंगचित्र प्रवासावर आधारीत असणार आहे. या पत्रिकेचे संपादक त्र्यंबक शर्मा यांनी याकरीता नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. यापुर्वी हा पुरस्कार प्रख्यात व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण, आबिद सुरती,अजित नैनन आणि प्राण यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

close