खरडा,भाकरी खाऊन प्रश्न सुटत नाही – पवार

April 4, 2012 1:57 PM0 commentsViews: 20

04 एप्रिल

राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के शंकरनारायणन यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी सातार्‍यात दुष्काळी भागाचा दौरा करताना खरडा, भाकरी खालली होती. त्यावर शरद पवारांनी म्हटलंय की, खरडा आणि भाकरी खावून दुष्काळी भागाचे प्रश्न सुटत नाही. पवार इथेच थांबले नाहीत तर त्यांनी राज्यपालांवरही जोरदार टीका केली. राज्यपालांनी दुष्काळी भागाचा दौरा करावा. निधीसाठी फक्त विनंती करण्यापेक्षा शंकरनारायणन यांनी राजभवनातून बाहेर पडावे पण त्यांना बाहेर पडण्याची इच्छाचं दिसत नाही, अशी कडक टीका आज पवारांनी सातार्‍यात केली.

रविवारच्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही युवराज राहुल गांधींच्या पाऊलावर पाऊलं ठेवलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात पांगरी या छोट्या खेड्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचं बांधकाम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांचे शिष्टमंडळ दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या मजुरांबरोबर सहभोजनचा आस्वाद घेतला. त्यामुळे सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला. मात्र आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा शेतजेवणाचा चांगलाच समाचार घेतला. खरडा आणि भाकरी खावून दुष्काळी भागाचे प्रश्न सुटत नाही. तसेच राज्यपाल के शंकरनारायणन यांनी दुष्काळी भागाचा दौरा करावा, निधीसाठी फक्त विनंती करण्यापेक्षा शंकरनारायणन यांनी राजभवनातून बाहेर पडावे पण त्यांना बाहेर पडण्याची इच्छाचं दिसत नाही, अशी कडक टीका पवारांनी केली.

close