अवकाळी पावसानं कांद्याचं नुकसान

November 23, 2008 1:03 PM0 commentsViews: 45

23 नोव्हेंबर मनमाडबब्बू शेखमनमाड शहरातल्या अवकाळी पावसानं कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे.आधीच पोळ कांद्याचं पीक उशिरा येतं. त्यात पावसाने कांदा भिजून खराब झाला आहे. त्यामुळे आता बाजारात कांद्याची आवक कमी आणि मागणी वाढणार आहे. बुधवारी रात्री मनमाडमध्ये अवकाळी पाऊस झाला.या पावसामुळे खळ्यात उघड्यावर पडून राहिलेला कांदा भिजून खराब झाला. शेतकरी सांगतात, अचानक पाऊस झाल्यानं आमचं मोठं नुकसान झालं. जेवढे कांदे झाकता आले तेवढे झाकले. कांदा खाली पडून होता.पाणी घुसून हजारो टन कांद्‌यांचं नुकसान झालं आहे.यावर्षी पाऊस उशीरा सुरु झाल्यामुळे सगळ्या पिकांवर परिणाम झाला.नेहमी दस-यानंतर लगेच बाजारात येणारा पोळ कांदा विक्रीसाठी आलाच नाही. त्यामुळे कांद्याचा भावही सध्या तेजीत आहे. अवकाळी पाऊस झाल्यानं शेतात लावलेल्या कांद्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यावर्षी कांद्याच्या आवकीवर परिणाम होईल. असं मनमाड कृषी उत्पन्न बाजाराचे सचिव,ए. एस. पांडे सांगतात.आधी उशिरा आलेला आणि मग अवकाळी आलेला पाऊस कांद्याचं मोठं नुकसान करून गेला. त्यामुळे व्यापारी आणि शेतक-यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणलं आहे.

close