श्रीमंत नेत्यांची ‘गरिबी’ उघड !

April 4, 2012 6:11 PM0 commentsViews: 2

04 एप्रिल

कॅग अहवाल फुटीने विधानसभेचा आजचा दिवस चांगलाच गाजला. सत्ताधारी मंत्र्यांच्या अनेक नातेवाईकांची नावं कॅगच्या अहवालात असल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 10 मंत्र्यांच्या नातेवाईकांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप केला. तर कॅगच्या या अहवालात आणखी धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. आघाडी सरकारमधल्या अनेक आजी माजी आमदारांनी गरिबीचं सोंग घेतल्यामुळे कॅगनं ताशेरे ओढले. आशीर्वाद सोसायटीत घरं मिळवण्यासाठी या नेत्यांनी मासिक उत्पन्न अतिशय अल्प दाखवलं.

श्रीमंत नेत्यांची 'गरिबी'

वसंत पुरके : विधानसभा उपाध्यक्ष – उत्पन्न 2500 रुपयेसुनील देशमुख, माजी राज्य मंत्री – उत्पन्न 10,600 रुपयेरामराजे नाईक-निंबाळकर, जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री – उत्पन्न 5,500 रुपयेअनिलकुमार अहेर, माजी आमदार – उत्पन्न 5,300 रुपयेजयंत ससाणे, माजी आमदार – उत्पन्न 5,400 रुपयेनितीन राऊत, स्वयंरोजगार आणि रोहयो मंत्री – उत्पन्न 12, 000 रुपयेसुदर्शन निमकर, माजी आमदार- उत्पन्न 4,000 रुपयेनरेश ठाकरे, माजी आमदार- उत्पन्न 8,000 रुपये अजित घोरपडे, माजी आमदार- उत्पन्न 6,000 रुपयेसंजय देशमुख, माजी आमदार – उत्पन्न 6,600 रुपये

close