लवासावर तहसिलदारांच्या कृपेमुळे कोट्यावधींचे नुकसान

April 4, 2012 4:37 PM0 commentsViews:

04 एप्रिल

जिल्हाधिकारी कार्यालयाने वारंवार सांगुन सुद्धा तहसिलदाराने लवासाकडून दंड वसूल न केल्याने सरकारचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची बाब उघड झाली आहे. याबाबतची कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत. गेल्या वर्षी पर्यावरण खात्याच्या सुचनेनुसार लवासा मध्ये झालेल्या गौण खनिज उत्खननाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एक टीम लवासामध्ये पाठवण्यात आली होती. या टीम ने केलेल्या मोजणीनुसार लवासाने घेतलेल्या परवानगी पेक्षा जास्त उत्खनन केल्याचं स्पष्ट झालं होतं.

त्यानुसार लवासाला दंड करावा का याविषयी राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आलं. यानंतर राज्यसरकारने लवासाला दंड ठोठावण्यात यावा अशी सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली. त्यानंतर वारंवार जवळपास तीन महिन्यांपासुन सुचना देऊनही तहसिलदाराने कारवाई करणारं पत्र लवासाला पाठवलं नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे जवळपास 48 कोटी रुपयांचा हा दंड गेल्या वर्षभरात घेण्यातच आला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसिलदारांना जानेवारी महिन्यापासून जवळपास तीन वेळा पत्र पाठवण्यात आलं आहे.मात्र वारंवार पत्र पाठवूनही तहसिलदार कार्यालयाकडून कारवाई करण्यात आलेली नाही.

close