सुभाष घई,विलासरावांना सुप्रीम कोर्टाचा दणका

April 4, 2012 10:02 AM0 commentsViews: 8

04 एप्रिल

व्हिसलिंग वुड्सची वीस एकर जागा आता सुभाष घईंना आता परत करावी लागणार आहे. हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. ही कारवाई रोखण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुभाष घईंनी केली होती. ती याचिका आता फेटाळली आहे. तर याप्रकरणात विलासराव देशमुख यांनी पदाचा गैरवापर केल्याचे ताशेरेही कोर्टाने ओढले आहे.

व्हिसलिंग वूड्सप्रकरणी 09 फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टाने काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांना दणका दिला. मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांनी सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूड्स या संस्थेला 20 एकर जमीन निविदा न मागवताच दिली होती. 32 कोटींची ही जमीन केवळ 3 कोटी रुपयात देण्यात आली होती. संस्थेला दिलेली 20 एकर जमीन परत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

2000 साली ही सरकारी जमीन कमी किमतीत घईंना देण्यात आली होती. नाना पटोले यांच्या समितीने कडक शब्दात या व्यवहारावर ताशेरे ओढले होते आणि कारवाईची शिफारस केली होती. पण कारवाई न झाल्याने प्रकाश पाठक यांनी कोर्टात याचिका दाखल केली. 2000 साली या जमिनीची किंमत होती 32 कोटी…पण मुक्ता आर्ट्सला ही जमीन मिळाली फक्त 3 कोटींमध्ये. विशेष म्हणजे ही जागा मंजूर करण्यापूर्वी सरकारने निविदाही मागवल्या नव्हत्या. यावर कॅगने ताशेरेही ओढले होते.

close