कापूस, सोयाबिनवर व्हॅटमुळे आघाडीत नाराजी

April 4, 2012 10:30 AM0 commentsViews: 2

04 एप्रिल

कापूस आणि सोयाबिनवर 5 टक्के व्हॅट आकारल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. विदर्भातल्या आमदारांनी मागणी करुनही अर्थमंत्री अजित पवार यांनी हा लावलेला व्हॅट मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या उलट पश्चिम महाराष्ट्रात पिकणार्‍या बेदाणा आणि मनुक्यावरील व्हॅटला स्थगिती देऊ असं आश्वासन अजित पवार यांनी विधिमंडळात दिलं. त्यामुळे अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन अजित पवारांच्या भुमिकेविरुध्द नाराजी व्यक्त केली आहे.

close