पद्म पुरस्कारांचे मोठ्या दिमखात वितरण

April 4, 2012 10:45 AM0 commentsViews: 2

04 एप्रिल

दिल्लीमध्ये आज पद्म पुरस्कारांचे मोठ्या दिमाखात वितरण करण्यात आले. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात आले. धर्मेंद्र, शबाना आझमी, मारिओ मिरांडा, व्हायोलीन वादक एम.एस. गोपालकृष्णन यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. खेळासाठी लिंबाराम आहारी, क्रिकेट कॉमेंट्रीसाठी रवी चतुर्वेदी, शिक्षण क्षेत्रासाठी अमरावतीचे प्रभाकर वैद्य यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. जानेवारीत या पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती.

close