पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं केली वृक्षतोड

November 23, 2008 2:13 PM0 commentsViews: 40

23 नोव्हेंबर नागपूरप्रशांत कोरटकरदोन वर्षापूर्वी नागपूरला देशातील दुस-या क्रमांकाचं हिरवं शहर म्हणून बहुमान मिळाला होता. पण याच नागपुरात सध्या बेसुमार अवैध वृक्षतोड होत आहे. यात कृषीविद्यापीठही मागं नाही. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं केलेल्या वृक्षतोडीबद्दल आता विद्यापीठाला हायकोर्टानं नोटीस बजावली आहे.नागपूरच्या सिताबर्डी परिसरातल्या महाराज बागेतले भक्कम वृक्ष वाटसरूंना सावली देत असतात. पण हे वृक्ष सध्या खुद्द पंजाबराव कृषी विद्यापीठाकडून तोडले जात आहेत. याविरोधात पर्यावरणवादी सिमा साहू यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे आता विद्यापीठाला हायकोर्टानं नोटीस बजावली आहे.नागपूर शहरातलं कुठलंही झाड तोडायचं असेल तर त्याची वनकायद्याप्रमाणे महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. पण कृषी विद्यापीठानं याबद्दल कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.1990 मध्ये महाराज बागेच्या बाजूला बस स्टँड तयार करण्यासाठी झाडं कापण्यात आली होती. तसंच नागपूर शहरात आय आर डीपी च्या रस्त्याच्या कामात बरीच झाडं तोडण्यात आली होती. रस्त्याकडेच्या अनेक झाडांभोवती पक्कं डांबरीकरण केल्यानं ही झाडं सुकत चालली आहेत.

close