साई संस्थानला गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाची नोटीस

April 4, 2012 10:52 AM0 commentsViews: 1

04 एप्रिलशिर्डी साई संस्थाच्या पैशांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिर्डी संस्थानच्या माजी विश्वस्त मंडळ आणि राज्य सरकारला औरंगाबाद उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तीन आठवड्यात राज्य सरकार, माजी विश्वस्त मंडळ आणि संस्थानने आपलं म्हणणं मांडावं असं या नोटीशीत सांगण्यात आलंय. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी तीन आठवड्यानंतर होणार आहे. शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळांच्या गैरव्यवहाराची सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती जमा केली. यात विश्वस्त मंडळाचे तब्बल 14 गैरव्यवहार उघड झालेत. त्याच्या आधारावर 19 मार्चला कोर्टाने याचिकाही दाखल करून घेतली होती.

close