मुंबई इंडियन्सची विजयी सलामी

April 4, 2012 5:51 PM0 commentsViews: 2

04 एप्रिल

आयपीएलच्या पाचव्या हंगामात मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच लढतीत मुंबई इंडियन्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा 8 विकेट राखून सुपर पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या चेन्नईनं मुंबईसमोर विजयासाठी 113 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. रिचर्ड लेव्ही आणि सचिन तेंडुलकरच्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर मुंबईने हे आव्हान 17 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. सचिन तेंडुलकर आणि रिचर्ड लेव्हीने पहिल्या विकेटसाठी 69 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. लेव्ही हाफसेंच्युरी करुन आऊट झाला. तर सचिन 16 रन्स करुन रिटायर्ड झाला. पण अंबाती रायडू आणि जेम्स फ्रँकलिनने सावध बॅटिंग करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

close