मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर आज आमनेसामने

April 4, 2012 11:18 AM0 commentsViews: 2

04 एप्रिल

आयपीएलच्या पाचव्या हंगामाला आज खर्‍या अर्थाने सुरुवात होणार आहे. यासाठी आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहे. यंदाच्या हंगामातही या दोन टीमकडेच विजेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिलं जातं आहे. आज रचेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअमवर रात्री 8 वाजता ही मॅच रंगणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हरभजन सिंग यांच्याकडे सोपवले आहे. दरम्यान, काल चेन्नईत या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा रंगला. उद्घाटन सोहळ्याची सुरुवातच अगदी दणक्यात झाली, अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या कवितेनं सोहळ्याला प्रारंभ झाला. यानंतर प्रभू देवा, प्रियांका चोप्रा, करिना कपूर आणि सलमान खानच्या अदाकारीने सोहळ्यात रंग भरला. अमेरिकेची पॉप स्टार कॅटी पेरीनं यानिमित्तानं भारतात पहिल्यांदाच आपली अदाकारी सादर केली. आता पाचव्या आयपीएलची रंगती किती रंगते हे आता प्रेक्षकच ठरवतील.

close