रिक्षाचालकांनी पुकारला 16 एप्रिलपासून बेमुदत संप

April 4, 2012 6:10 PM0 commentsViews: 1

04 एप्रिल

रिक्षा चालकांच्या वारंवारच्या संपामुळे त्रासलेल्या सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा संपाचा सामना करावा लागणार आहे. येत्या 16 एप्रिलपासून रिक्षा चालकांनी बेमुदत राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. इलेक्ट्रानिक-मीटरचा विरोध करण्यासाठी हा संप करण्यात येतोय. त्याशिवाय रिक्षाचं भाडं वाढवावं, अशी मागणी रिक्षा युनियनने केली आहे. या संपात 15 लाख रिक्षाचालक संपात सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे.

मागिल आठवड्यात हायकोर्टाने रिक्षांना ई-मीटर बसवणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. मात्र कोर्टाच्या या निर्णायला विरोध करत रिक्षाचालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या अगोदर दोन महिन्यांपुर्वी मुंबई कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्यामुळे हा संप एप्रिल महिन्यात करणार असल्याचे स्पष्ट केलं. एकीकडे ई-मीटरला विरोध आणि वाढती महागाईचे कारण देत रिक्षा चालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे.

close