आदर्श प्रकरणी फाटक, तिवारी यांना सीबीआय कोठडी

April 4, 2012 5:10 PM0 commentsViews:

04 एप्रिल

आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या जयराज फाटक आणि रामानंद तिवारी यांना सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. जयराज फाटक आणि रामानंद तिवारी दोघंही निलंबित प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांना सीबीआयने कालच अटक केली. आज त्यांना सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर त्यांना 12 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

आदर्श प्रकरणी यापूर्वी सीबीआयने सात जणांना अटक केली. त्यात सोसायटीचे को-प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी यांच्यासह आणि सनदी अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांच्या सीबीआय कोठडीची मुदत काल संपली. त्यामुळे काल या 7 आरोपींना सेशन्स कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्यांना 17 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

दरम्यान,एकीकडे सीबीआयने आदर्श प्रकरणी अटकसत्र सुरू केलंय पण दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या पातळीवर या प्रकरणी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी पक्ष आदर्श प्रकरणी चर्चा करण्याचं टाळताय असा आरोप विरोधकांनी केला. तसेच याप्रकरणी राजकारण्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली.

close