अण्णांच्या आंदोलनाला वर्षपूर्ती ; लढा सुरूच ठेवणार !

April 5, 2012 9:50 AM0 commentsViews: 6

05 एप्रिल

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण होतंय. या आंदोलनामुळे पूर्ण देश जागृत झाला असून हे आंदोलन यापुढंही सुरूच राहिलं असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला. कुठल्याही परिस्थितीत लोकपाल विधेयक मंजूर करून घेणारच असंही ते म्हणाले. संसदेचं अधिवेशन मे महिन्यात संपणार आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहू नंतर मात्र देशभर पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही अण्णांनी दिला. 2014 च्या निवडणुकीच्या काळात जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असंही अण्णांनी जाहीर केलं.

भारतीय टीम वर्ल्डकप जिंकल्याच्या जल्लोष देशभर साजरा होत असताना दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर 5 एप्रिल 2011 लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. सुरुवातील या आंदोलनाची दखल कमी मात्र प्रमाणावर झाली पण नंतर आंदोलनाची दखल माध्यमांनी घेताच देशभरातून नागरिक रस्त्यावर उतरले. भ्रष्टाचार संपवा अशी मागणी एकमुखाने केली गेली. याला निमित्त होते अण्णांचे आंदोलन. आज याच आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षभरात अण्णांनी तीन आंदोलन करुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. पण याच बरोबर टीम अण्णांच्या कृत्यामुळे टीकेची धणी झाली. गेला वर्षभर लढा देऊन सुध्दा अण्णांच्या आंदोलनाला प्रसिध्दी मिळाली पण यश हवे तितके मिळाले नाही. आता येणार्‍या काळात अण्णांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. संसदेचं अधिवेशन मे महिन्यात संपणार आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहू नंतर मात्र देशभर पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही अण्णांनी दिला. त्याचबरोबर 2014 च्या निवडणुकीच्या काळात जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असंही अण्णांनी जाहीर केलं.

close